Monday, May 12, 2025

कोकणमहाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीयरत्नागिरी

शिवसेना ठाकरे गटाच्या माजी मंत्र्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

शिवसेना ठाकरे गटाच्या माजी मंत्र्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेता आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दापोलीच्या रिसॉर्ट प्रकरणात त्यांची ईडी चौकशी देखील झाली आहे.


दापोली येथील साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असून परब यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्याशिवाय, हे रिसॉर्ट खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने कमावलेला पैसा वापरला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.


https://twitter.com/ANI/status/1589808605787979777

दापोली पोलीस ठाण्यात रुपा दिघे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अॅड. अनिल परब यांच्यासह सुरेश तुपे आणि अनंत कोळी यांच्याविरोधात सोमवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास कलम ४२० आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानुसार एकहून अधिक व्यक्तींनी एकत्र येत गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक आदी आरोप परब आणि इतरांविरोधात आहे.


दरम्यान, पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार यांनी ३१ जानेवारी २०२२ रोजी दापोली, रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून ते तोडण्याचे आदेश दिले होते. ९० दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, ९० दिवस पूर्ण झाल्यानंतरही रिसॉर्ट पाडण्यात आले नव्हते. त्यानंतर सोमय्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रिसॉर्ट पाडण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

Comments
Add Comment