कल्याण (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा नौदलाच्या स्थापनेच्या ३५६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दुर्गाडी किल्ला, कल्याण येथे स्मारक स्वरूपात भारतीय नौदलाची युद्धनौका टी-८० विराजमान करण्यासंदर्भात भारतीय नौदल आणि स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी गुरुवारी सामंजस्य करार केला. टी-८० स्मारक हे आता एसकेडीसीएल च्या नदी किनारा विकास प्रकल्पातील आरमार स्मारकाचा भाग असेल.
लवकरच प्रेक्षकांसाठी निर्माण होणारे हे आरमार स्मारक प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत राज्याचा समृद्ध सागरी इतिहास दर्शवेल. तसेच कायमस्वरूपी सार्वजनिक प्रदर्शनात भारतीय नौदलाच्या अनेक प्रेरणादायी घटना चित्रे, शिल्पे, कलाकृती आणि मल्टिमिडीयाच्या रूपात मांडले जातील. नियोजनाच्या टप्प्यापासूनच हा प्रकल्प भारतीय नौदलातील अधिकारी आणि अभ्यासकांच्या सक्रिय सहभागासह विकसित केला गेला आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…