फेडरल रिझर्व्ह दरवाढीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम

  225

मुंबई : अमेरिकन शेअर बाजाराला फेडरल रिझर्व्हची महागाई नियंत्रित करण्याची पद्धत पसंत पडली नाही. अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा व्याजदर वाढवल्यानंतर शेअर बाजार कोसळला आणि गेल्या काही दिवसांपासून रुळावर आलेला वॉल स्ट्रीट पुन्हा घसरला.


अमेरिकीची मध्यवर्ती बँक, फेडरल रिझव्‍‌र्हने व्याजदर वाढवल्‍याच्‍या परिणामामुळे काल अमेरिकन शेअर बाजारांत कमालीची घसरण झाली होती. तर आज भारतीय बाजारही जोरदार घसरणीने उघडले. फेड रिझर्व्हने बेंचमार्क व्याजदर ०.७५ टक्क्यांनी वाढवले, ज्याचा पहिल्यापासूनच अंदाज वर्तवण्यात आला होता. परिणामी भारतीय बाजाराचा निर्देशांक निफ्टी आज १८,००० च्या खाली घसरला आणि सेन्सेक्स ६०,५०० पर्यंत उघडला.


आज बाजाराची सुरुवात लाल चिन्हाने झाली आणि बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स ३९४.५२ अंकांच्या किंवा ०.६५ टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह ६०,५११ वर उघडला. दुसरीकडे, एनएसईचा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी ११४.५० अंकांच्या किंवा ०.६३ टक्क्यांच्या घसरणीसह १७,९६८ वर उघडला.


फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानंतर आज, बाजाराच्या पूर्व प्रारंभी शेअर बाजार लाल चिन्हात दिसला. प्री-ओपनिंगमध्ये बीएसई सेन्सेक्स ३३७ अंकांनी किंवा ०.५५ टक्क्यांनी घसरून ६०,५६८ च्या पातळीवर होता. दुसरीकडे, एनएसईचा निफ्टी १३१ अंकांनी म्हणजेच ०.७३ टक्क्यांनी घसरून १७,९५१ च्या पातळीवर होता.


दरम्यान, पहिल्या १० मिनिटांत सेन्सेक्सच्या ३० समभागांपैकी फक्त ७ समभाग वधारताना दिसले आणि २३ समभागात घसरणीची नोंद झाली. त्याच वेळी, निफ्टीच्या ५० पैकी १५ समभागात वाढ झाली तर ३५ समभागात घसरण झाली.


बुधवारी, एकीकडे फेडने सलग चौथ्यांदा व्याजदर वाढवण्याची घोषणा केली तर दुसरीकडे, अमेरिकन स्टॉक एक्स्चेंजचा प्रमुख निर्देशांक डाऊ जोन्स ५०५ अंकांनी किंवा १.५५ टक्क्यांनी घसरून सुरुवातीनंतर ३२,१४७ पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, एस अँड पी ५०० देखील २.५० टक्क्यांनी कोसळला. तर, नॅस्डॅक कंपोझिट ३.३६ किंवा ३३६ अंकांनी घसरून १०,५२४ वर बंद झाला.

Comments
Add Comment

देशातील गरिबीचा दर घसरला

२०११ पासून १७ कोटी भारतीय लोक गरिबीतून आले बाहेर नवी दिल्ली : भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा समान समाज बनला आहे.

CA Exam Result: सीए परीक्षेचा निकाल जाहीर; मुंबई-ठाण्याच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

सीए अंतिम परीक्षेत मुंबईचा 'टॉपर' मुंबई: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)कडून मे २०२५

'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान हादरला! भारतावर नजर ठेवण्यासाठी चीनकडून खरेदी करणार KJ500 रडार

नवी दिल्ली: भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला हादरवून टाकले आहे. भारतीय सैन्याच्या आक्रमक तयारीने आणि

Terrorist hideout destroyed: पुंछमध्ये दहशतवादी अड्डा नष्ट, शस्त्रसामुग्री जप्त

सुरनकोट जंगलात लष्कर-पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शस्त्रसाठा सापडला; किश्तवाडमध्ये स्वतंत्र दहशतवादविरोधी

Bihar polls: सॅनिटरी पॅडवर राहुल गांधींचा फोटो; 'हा महिलांचा अपमान' महिलांची टीका

पाटणा : बिहार काँग्रेसने "प्रियदर्शिनी उड्डाण योजना" अंतर्गत पाच लाख सॅनिटरी पॅड बॉक्स वाटप करण्याची घोषणा केली

शाळेच्या गेटवर विद्यार्थ्याचा वडिलांच्या मांडीवर मृत्यू

बाराबंकी : शाळेच्या गेटवर विद्यार्थ्याचा वडिलांच्या मांडीवर मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशमधील