Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीफेडरल रिझर्व्ह दरवाढीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम

फेडरल रिझर्व्ह दरवाढीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम

मुंबई : अमेरिकन शेअर बाजाराला फेडरल रिझर्व्हची महागाई नियंत्रित करण्याची पद्धत पसंत पडली नाही. अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा व्याजदर वाढवल्यानंतर शेअर बाजार कोसळला आणि गेल्या काही दिवसांपासून रुळावर आलेला वॉल स्ट्रीट पुन्हा घसरला.

अमेरिकीची मध्यवर्ती बँक, फेडरल रिझव्‍‌र्हने व्याजदर वाढवल्‍याच्‍या परिणामामुळे काल अमेरिकन शेअर बाजारांत कमालीची घसरण झाली होती. तर आज भारतीय बाजारही जोरदार घसरणीने उघडले. फेड रिझर्व्हने बेंचमार्क व्याजदर ०.७५ टक्क्यांनी वाढवले, ज्याचा पहिल्यापासूनच अंदाज वर्तवण्यात आला होता. परिणामी भारतीय बाजाराचा निर्देशांक निफ्टी आज १८,००० च्या खाली घसरला आणि सेन्सेक्स ६०,५०० पर्यंत उघडला.

आज बाजाराची सुरुवात लाल चिन्हाने झाली आणि बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स ३९४.५२ अंकांच्या किंवा ०.६५ टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह ६०,५११ वर उघडला. दुसरीकडे, एनएसईचा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी ११४.५० अंकांच्या किंवा ०.६३ टक्क्यांच्या घसरणीसह १७,९६८ वर उघडला.

फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानंतर आज, बाजाराच्या पूर्व प्रारंभी शेअर बाजार लाल चिन्हात दिसला. प्री-ओपनिंगमध्ये बीएसई सेन्सेक्स ३३७ अंकांनी किंवा ०.५५ टक्क्यांनी घसरून ६०,५६८ च्या पातळीवर होता. दुसरीकडे, एनएसईचा निफ्टी १३१ अंकांनी म्हणजेच ०.७३ टक्क्यांनी घसरून १७,९५१ च्या पातळीवर होता.

दरम्यान, पहिल्या १० मिनिटांत सेन्सेक्सच्या ३० समभागांपैकी फक्त ७ समभाग वधारताना दिसले आणि २३ समभागात घसरणीची नोंद झाली. त्याच वेळी, निफ्टीच्या ५० पैकी १५ समभागात वाढ झाली तर ३५ समभागात घसरण झाली.

बुधवारी, एकीकडे फेडने सलग चौथ्यांदा व्याजदर वाढवण्याची घोषणा केली तर दुसरीकडे, अमेरिकन स्टॉक एक्स्चेंजचा प्रमुख निर्देशांक डाऊ जोन्स ५०५ अंकांनी किंवा १.५५ टक्क्यांनी घसरून सुरुवातीनंतर ३२,१४७ पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, एस अँड पी ५०० देखील २.५० टक्क्यांनी कोसळला. तर, नॅस्डॅक कंपोझिट ३.३६ किंवा ३३६ अंकांनी घसरून १०,५२४ वर बंद झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -