Wednesday, January 15, 2025
Homeताज्या घडामोडीसेयूलमध्ये हॅलोविन पार्टीत चेंगराचेंगरी; १४९ जणांचा मृत्यू

सेयूलमध्ये हॅलोविन पार्टीत चेंगराचेंगरी; १४९ जणांचा मृत्यू

सेयूल : दक्षिण कोरियाची राजधानी सेयूलमध्ये हॅलोविन पार्टीदरम्यान चेंगराचेंगरीची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत आत्तापर्यंत १५१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या पार्टीतील ५० लोकांना हृयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. तर जवळपास १४९ जण यामध्ये जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढत असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोरोनाच्या संकटानंतर मोठ्या प्रमाणावर खुल्या पद्धतीने नो मास्क हॅलोवीन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हॅलोवीन फेस्टिवल ज्या ठिकाणी आयोजित केला जाणार होता तिथे एक लाख लोक जमल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत अनेकजण बेपत्ता असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. तर मृत्यू झालेल्यांपैकी अनेकांचे वय हे २० ते ३०च्या दरम्यान होते.

सोशल मीडियावर हॅलोवीन फेस्टिवलच्या गर्दीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओतून काही लोक मोठी गर्दी जमल्यामुळे चक्कर येऊन पडत असल्याचे दिसत आहे. आरोग्य यंत्रणेकडून आपत्कालीन सेवांद्वारे रस्त्यावरच त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलच्या रस्त्यावर मोठ्या संख्येने लोक हॅलोवीन फेस्टिवल साजरा करण्यासाठी जमले होते.

ख्रिश्चन धर्मियांत ३१ ऑक्टोबर रोजी हॅलोवीन हा उत्सव साजरा केला जातो. हॅलोवीन हा शब्द १७४५ पासून वापरला जातो. पहिल्यांदा हा सण इंग्लंड आणि आयर्लंड येथे साजरा करण्यात आला होता. त्यानंतर हा सण जगभर साजरा केला जाऊ लागला. यावेळी मृत व्यक्तींचे आत्मा त्यांना भेटायला येतात असा समज आहे त्यामुळे हॅलोवीन पार्टीत भूतप्रेतांची वेशभूषा केली जाते. पूर्वजांच्या स्मरणासाठी साजरा केल्या जाणाऱ्या पार्टीत नारंगी आणि काळ्या रंगाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -