ड्रग्ज प्रकरणात भारती सिंग-हर्ष लिंबाचियाविरुद्ध आरोपपत्र दाखल

मुंबई : कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्याविरुद्ध एनसीबीने आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र ड्रग्ज प्रकरणी करण्यात आले आहे. या दोघांविरुद्ध न्यायालयात २०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. २०२० मध्ये दोघांना एनसीबीने अटक केली होती. दोघेही जामिनावर बाहेर असले तरी जून २०२० मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जच्या सेवनाची अनेक प्रकरणं समोर आली होती. एनसीबीने तपास सुरू केला तेव्हा अनेक बडे सेलिब्रिटी यात अडकले होते.


एनसीबीने ड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खानसह अनेक बड्या सेलिब्रिटींची चौकशी केली होती. याच क्रमाने, एनसीबीने नोव्हेंबर २०२० मध्ये भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या कार्यालयावर आणि घरावर छापे टाकले. यावेळी त्याच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला. यानंतर एनसीबीने भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाला अटक केली होती.


एनसीबीने हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंगला न्यायालयात हजर केले आणि त्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान त्याननंतर १५ हजार रुपये भरुन जामीन मंजूर झाला. तेव्हापासून दोघेही बाहेर आहेत. मात्र, फिर्यादीचे म्हणणे न ऐकता जामीन मंजूर करण्यात आल्याचा दावा एनसीबीने न्यायालयात केला होता.

Comments
Add Comment

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा हिकारू नाकामुरावर पलटवार

मुंबई  : ‘चॅम्पियन्स शोडाउन’ या प्रतिष्ठित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय विश्वविजेता डी.

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

कबुतरखान्यांसाठी महापालिकेकडून पर्यायी जागांचा शोध

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन मुंबई

बेस्टच्या १५७ नव्या वातानुकूलित बसगाड्यांचे लोकार्पण

बेस्टला सक्षम करण्याचे राज्य सरकारचे ध्येय मुंबई : 'जोपर्यंत बेस्ट उपक्रम ४० टक्क्यांपर्यंत बस

जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टसचा महाराष्ट्रासोबत करार

देशातले पहिले राज्य; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक मुंबई : जगभरात नामांकित असणाऱ्या अबू धाबी पोर्टस ग्रुपचा महाराष्ट्र

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी - तटकरे

मुंबई : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ