Wednesday, March 26, 2025
Homeदेशसावधान! Corona परत येतोय?

सावधान! Corona परत येतोय?

मुंबई : देशात पुन्हा एकदा Corona परत येण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. कोरोनाच्या उगम झालेल्या चीनमधील वुहानमधील काही भागात कडक लॉकडाऊनही केले आहे.

ओमायक्रॉन व्हेरियंटच्या x bb आणि bf.7 या नवीन उप-प्रकारांची प्रकरणे वाढत आहेत. आतापर्यंत देशात XBB च्या ७० हून अधिक प्रकरणांची नोंद झाली आहे. या प्रकारामुळे सिंगापूर, चीन आणि अमेरिकेत कोविडची प्रकरणे वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने देखील XBB स्ट्रेनबाबत अलर्ट जारी केला आहे. WHO म्हणते की या प्रकारामुळे काही देशांमध्ये कोविडची नवीन लाट येऊ शकते.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की ओमायक्रॉनचे हे नवीन प्रकार वेगाने पसरू शकतात, परंतु यामुळे कोविड विषाणूची तीव्रता बदलणार नाही. परंतु वृद्ध आणि जुने आजार असलेल्या रुग्णांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भारतातील अनेक राज्यांमध्ये या प्रकाराचे संक्रमित रुग्णही समोर येत आहेत. आतापर्यंत एकट्या महाराष्ट्रात १८ हून अधिक रुग्ण सापडले आहेत. याशिवाय ओडिशा, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्येही एक्स बीबीची प्रकरणे समोर येत आहेत.

शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की काही महिन्यांत, हा प्रकार ओमायक्रॉनच्या इतर प्रकारांपेक्षा वेगाने पसरू शकतो. हा धोका लक्षात घेऊन WHO ने सर्व देशांना व्हायरस ओळखण्यासाठी ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि जीनोम टेस्टिंग वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -