पंचकुला : १५ वर्षांपेक्षा जास्त वयाची मुस्लिम मुलगी तिच्या पसंतीच्या कोणत्याही व्यक्तीशी लग्न करू शकते आणि तिचा विवाहसुध्दा वैध मानला जाईल, असा महत्वपूर्ण निकाल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणावर सुनावणी करताना दिला. या प्रकरणी १६ वर्षीय मुलीलाही पतीसोबत राहण्याची परवानगी देण्यात आली.
न्यायमूर्ती विकास बहल यांच्या खंडपीठासमोर जावेद नावाच्या व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी झाली. यामध्ये त्याने आपल्या १६ वर्षांच्या पत्नीसोबत राहण्याची परवानगी मागितली होती. मुलीला हरियाणातील पंचकुला येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. याचिकाकर्त्याने दावा केला होता की, ‘लग्नाच्या वेळी त्याच्या पत्नीचे वय १६ वर्षांपेक्षा जास्त होते. लग्न तिच्या स्वेच्छेने आणि कोणतीही जबरदस्ती न करता झाले.’
जावेदने आपल्या वकिलामार्फत सांगितले की, आम्ही दोघेही मुस्लीम आहोत आणि २७ जुलैला मणि माजरा येथील मशिदीत मुस्लिम रितीरिवाजांनुसार आम्ही निकाह केला. युनूस खान विरुद्ध हरियाणा राज्यातील उच्च न्यायालयाच्या समन्वय पीठाच्या निर्णयावर अवलंबून राहून याचिकाकर्त्याच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, ‘मुलीला याचिकाकर्त्यासोबत राहण्याची परवानगी द्यावी.’
मात्र, राज्याच्या वकिलांनी या याचिकेला विरोध करत ती अल्पवयीन असल्यामुळे तिला बालसुधारगृहामध्ये ठेवण्यात येत असल्याचे सांगितले. राज्याच्या वकिलांनी याचिका फेटाळण्याची विनंती केली होती. परंतु, उच्च न्यायालयाने आपल्या निकालात १५ वर्षे पूर्ण केलेल्या मुलीला तिच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करण्याचा अधिकार आहे, असे नमूद केले आहे.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…