Tuesday, December 10, 2024
Homeदेशधक्कादायक! लग्नसमारंभात रसगुल्ला न मिळाल्याने चक्क चाकूने वार

धक्कादायक! लग्नसमारंभात रसगुल्ला न मिळाल्याने चक्क चाकूने वार

एकाचा मृत्यू तर १२ हून अधिक जखमी

आग्रा (वृत्तसंस्था) : लग्नसमारंभात जेवणाच्या ठिकाणी रसगुल्ला न मिळाल्याने चक्क चाकूने वार केल्याची धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये घडली आहे. या वादात एकाचा खून, तर १२ हून अधिक जण जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर वधूला न घेताच वऱ्हाडी घरी परतले.

खंडौलीतील व्यापारी वकार यांची मुले जावेद आणि रशीद यांचे आग्रा येथील एतमादपूर शहरातील विनायक भवन येथे लग्न होते. लग्नाआधी असलेल्या डिनर दरम्यान रसगुल्ल्यावरून पाहुण्यामध्ये वाद झाला. मुलाच्या लग्नाची मिरवणूक आत पोहोचल्यानंतर पाहुण्यांसाठी रसगुल्ले ठेवण्यात आले होते. एकाने एकापेक्षा जास्त रसगुल्ले मागितले असता काउंटरवरील तरूणाने नकार दिला म्हणून वाद सुरू झाला. या वादानंतर दोन्ही पक्षांत जोरदार भांडण पेटले. अखेर चाकू निघालेत. चाकूने जोरदार हाणामारी आणि खुर्चीफेकही झाली. या हाणामारीतच एकाचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या गोंधळानंतर काही वेळातच लग्नाचे आनंददायी वातावरण दु:खात विलीन झाले. या घटनेने मिरवणुकीतील २० वर्षीय सनी खलील याचा मृत्यू झाला तर शाहरूख जखमी झाला. या गोंधळानंतर वरपक्षाने चिडत लग्नास नकार दिला. वरपक्षाची समजूत काढल्यानंतरही वधूला न घेताच ते घरी परतले. या संपूर्ण प्रकरणानंतर वधूपक्षाच्या घरी शोककळा पसरली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -