शिबानी जोशी
आयर्लंडमध्ये जन्मलेली मार्गरेट नोबेल स्वामी विवेकानंदांची शिष्या स्वामीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन त्या भारतात आल्या. “निवेदिता म्हणजे समर्पण”. भारतीयांची सेवा हेच ध्येय व भारत हीच कर्मभूमी मानून त्या भारतात राहिल्या. भगिनी निवेदिता एक शिक्षण तज्ज्ञ होत्या. अनेक धर्मांचा अभ्यास त्यांनी केला होता. हिंदू धर्म स्वीकारून नि:स्वार्थ सेवा करणारी भगिनी निवेदिता तिचे नाव घेऊन संस्थेने त्यांचा आदर्श जपला आणि भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ स्थापन केले. याचेच उदाहरण म्हणजे अनगाव इथे मुलींसाठी संस्थेनं बालिकाश्रम सुरू केला.
स. ग. देव बालिकाश्रम अनगाव शहरातील सेवा वस्तीमध्ये एखाद्या पालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आजी किंवा आई एकटी मुलांना सांभाळत असते अशा वेळी कामावर जाताना मुलीला एकटे ठेवणं ही आईच्या दृष्टीने मोठी समस्या असते, असुरक्षित वातावरण या सगळ्यामुळे अशा मुलींना आश्रमात ठेवले जाते. आजपर्यंत अनेक विद्यार्थी मुलं-मुली आश्रमामध्ये शिकून गेली आहेत, त्यापैकी एक मुलगा इंजिनीयर तर काही मुली नर्सिंग शिक्षण घेऊन मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करत आहेत. आपले उत्तम आदर्श संसार करीत आहेत. या ठिकाणी प्रत्येक मुलीच्या कलागुणांना वाव दिला जातो. कला, क्रीडा याचे प्रशिक्षण दिले जाते. कमी तेथे आम्ही ही भावना ठेवून शिवभावनेने जीव सेवा हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून ते सार्थ करण्याच्या प्रयत्नात ठाण्यातील महिलांनी भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळाची स्थापना केली. १९९३ साली आपला हा आश्रम स्थापन झाला. आज येथे २२ मुली संस्कारक्षम शिक्षण घेऊन तिथेच राहत आहेत.
समाजात बालवाडीतील शिक्षणाबरोबर संस्कार मिळाले तर ती मुलं मोठेपणी भारतीय जीवनाचे संस्कार मनात ठेवून देशासाठी चांगली कामे करतील या विचाराने संस्थेने बालवाड्या चालू केल्या. प्रथम ठाणे शहरात वागळे इस्टेट या भागामध्ये सेवा वस्त्यात बालवाड्या सुरू झाल्या, त्यावेळी हा भागही आजच्या इतका पुढारलेला नव्हता. नंतर पालघर जिल्हा येथे विविध पाड्यांवरती जव्हार, खोडाळा, मोखाडा याठिकाणी साठ बालवाड्या चालू आहेत व लवकरच विक्रमगड येथे नवीन १५ बालवाड्या सुरू होणार आहेत. यासाठी शिक्षिका त्याच वस्तीतून प्रशिक्षित केल्या जातात. त्या शिक्षकांना ट्रेनिंग देण्यासाठी महिन्यातून दोन वेळा ठाण्यातून प्रशिक्षिका जातात. संस्थेची “बालवाडीच्या माध्यमातून ग्रामविकास” अशी संकल्पना आहे. घरापासून दूर इतक्या लहान मुलांना शाळेत पाठवणे शक्य नसते. त्यामुळे शाळेत न जाण्याचं प्रमाण आडगावात खूप असतं. त्यामुळे बळवड्या पोचल्या तर शिक्षणाची आवड निर्माण होईल. म्हणून छोट्या छोट्या वस्तीमध्ये मुलांना जमवून बालवाडी चालवून त्या मुलांना शाळेत प्रवेश मिळण्यायोग्य अभ्यासाची तयारी व गोडी निर्माण करून घेतली जाते. त्यासाठी गाणी, गोष्टी, खेळ या माँँध्यमातून त्यांच्या परिसरातील निसर्ग, विज्ञान, गणित हे विषय शिकवून भारतीय संस्कार त्यांच्या मनात रुजवले जातात. हातात पेन्सिल न घेता खेळातून व गोष्टीतून त्यांना शिक्षण दिले जाते. हे काम करताना तिथल्या छोट्या छोट्या समस्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्या की त्या सोडवण्याचा प्रयत्नही केला जातो.
या वनवासी पाड्यांवरती कुपोषण ही मोठी समस्या आहे. त्यामुळे पोषक आहार, गर्भिणी मातांचा पोषक आहार अशा विविध योजना राबवल्या जातात. त्यासाठी रोज डाळ, तांदूळ, मोड आलेली कडधान्य युक्त खिचडी दिली जाते. यामध्ये कधी नारळ, गूळ, तर कधी स्थानिक भाज्या घालून पदार्थ बनवला जातो. आयुर्वेदानुसार साजूक तूप व करडईचे तेल घालून ती खिचडी संपृप्त केली जाते. अंदाजे दोन हजार मुलांना हा पोषक आहार लवकरच दिला जाईल.
सर्व समविचारी कार्यकर्ते एकत्र येऊन सेवा भावनेने हे काम करीत आहेत, यासाठी समाजातील अनेक दातृत्ववान व्यक्ती, अनेक संस्था आम्हाला निधी देत असतात. त्या निधीतून व कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे मंडळांनी खोडाळा या भागात साडेपाच एकर जागा घेतली आहे. संपूर्ण डोंगराळ भागांमध्ये असणाऱ्या जागा जिथे नक्षत्र बाग तयार करण्याची योजना आहे. आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड त्या ठिकाणी करण्यात येत आहे. आत्तापर्यंत जवळजवळ पंधराशे झाडे या जागेत लावून झाली असून ५००० झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे.
“केल्याने होत आहे रे “परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे म्हणून या जागेत वनवासी राम व हनुमंताचे मंदिर बांधण्याचा संकल्प आहे. याच जागी आजूबाजूच्या परिसरामध्ये असणाऱ्या लोकांसाठी समाज मंदिर हॉल बांधण्याचाही संस्थेचा संकल्प आहे. याशिवाय उद्योग प्रशिक्षण केंद्र तेथे सुरू करण्याचा मानस आहे. ठाणे शहरात राहणाऱ्या समविचारी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या विश्वस्त संस्थेतून ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण दुर्गम आणि आदिवासी भागात काम करत या भागालाही विकासाच्या मार्गावर आणून ठेवण्याचं काम सुरू आहे.
इस्लामाबाद : पहलगाम येथे पर्यटकांवर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हल्ला केला. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान…
उत्तर प्रदेश: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने देशातील सर्व…
नवी दिल्ली: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त (Rahul Gandhi Controversial Statement on Savarkar)…
बंगळुरू : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे शुक्रवार २५ एप्रिल…
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या…
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…