इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे बंगळुरूत निधन

बंगळुरू : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे शुक्रवार २५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी बंगळुरू येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. के. कस्तुरीरंगन यांनी सकाळी १०.४३ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव रविवार २७ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान रामन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये जनतेला अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.

के. कस्तुरीरंगन हे नऊ वर्षे इस्रोचे प्रमुख होते. या कार्यकाळात त्यांनी इस्रो, अंतराळ आयोग आणि अंतराळ विभागाचे नेतृत्व केले. ते २७ ऑगस्ट २००३ रोजी निवृत्त झाले. के. कस्तुरीरंगन यांच्या कार्यकाळात पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही रॉकेटच्या विकास कार्यक्रमांनी वेग घेतला.



पर्यावरणाच्या रक्षणासाठी के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षेखाली समिती स्थापन करण्यात आली. नंतर माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. दोन्ही समित्यांनी पश्चिम घाटावर खाणकाम आणि सर्व प्रकारच्या उत्खननावर बंदी घालण्याची शिफारस केरळ आणि कर्नाटक सरकारला केली होती. दोन्ही राज्यांमध्ये या शिफारशींना स्थानिक पातळीवरुन विरोध झाला. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षेखाली स्थापन केलेल्या समितीने फक्त एकाच पिकाची शेती करण्याऐवजी एका वर्षात एक पेक्षा जास्त पिकांची शेती एकाच शेत जमिनीवर करण्याचीही शिफारस केली होती. विशेष म्हणजे अशीच शिफारस माधव गाडगीळ समितीनेही केली होती. पण के. कस्तुरीरंगन आणि माधव गाडगीळ यांच्या शिफारशी राजकीय कारणांमुळे पुढे बासनात गुंडाळण्यात आल्या.



भारताची रिमोट सेन्सिंग क्षमता विकसित करण्यात के. कस्तुरीरंगन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी भास्कर I आणि II उपग्रहांसाठी प्रकल्प संचालक म्हणून काम केले. पृथ्वीची अंतराळातून पाहणी करणे आणि पृथ्वीवरील तांत्रिक कामांसाठी उपग्रह प्रक्षेपित करण्याचा मोठा कार्यक्रम त्यांच्या कार्यकाळात सुरू झाला. इन्सॅट - २, आयआरएस १ अ आणि १ ब हे महत्त्वाचे उपग्रह त्यांच्या कार्यकाळात प्रक्षेपित करण्यात आले.

भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे शिल्पकार म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांनी शालेय आणि उच्च शिक्षणात व्यापक सुधारणा प्रस्तावित करणाऱ्या समितीचे अध्यक्षपद भूषवले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलपती, कर्नाटक ज्ञान आयोगाचे अध्यक्ष, नियोजन आयोगाचे सदस्य आणि २००३ ते २००९ याकाळात राज्यसभेचे मानद सदस्य म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या अभूतपूर्व कार्यासाठी सरकारने त्यांना वेगवेगळ्या वर्षात पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरविले आहे.
Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत