दिवाळीच्या सुट्टीत राणी बाग फुल्ल

मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीची सुट्टी असल्याने सध्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणी बागेत पर्यटकांनी केली आहे. मंगळवारी २५ हजारांहून अधिक पर्यटकांनी राणीबागेची सैर केली.


सध्या दिवाळीच्या सणांमुळे सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने राणीबागेची सैर करत आहेत. मंगळवारी सुमारे २५,०२९ पर्यटकांनी राणी बागेला भेट दिली. बागेच्या आत आणि बाहेर पर्यटकांची गर्दी झाली होती. मंगळवारी पर्यटकांमुळे उद्यान विभागाला ९,५७,८२५ रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या ५ दिवसांत उद्यानात ७४,३५० पर्यटकांनी भेट दिली असून त्यातून २८,८९,७१० रुपयांचा महसूल जमा झाला आहे.


सध्या उद्यान-प्राणिसंग्रहालयात एकूण १३ जातींचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी व ७ जातींचे ३२ सरपटणारे तसेच जलचर प्राणी असे एकूण २७३ प्राणी, पक्षी आहेत. म्हणजेच राणीबागमध्ये सध्या शंभरहून अधिक प्राणी आहेत. विविध ३० प्रजातींचे सुमारे २५० पक्षी पर्यटकांना या ठिकाणी पाहायला मिळतात. याशिवाय बागेतील २८६ प्रजातींची सुमारे साडेतीन हजार झाडे, दुर्मिळ वृक्ष पाहण्यासाठी अनेक वृक्षप्रेमी राणीबागेत हजेरी लावतात. पेंग्विन हा पर्यटकांचे खास आकर्षण बनला आहे. याशिवाय बाराशिंगा, तरस, अस्वल, बिबट्या, वाघ यांसारखे प्राणी व रॉयल बंगाल वाघांची जोडी बघण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.


वार पर्यटक महसूल


शुक्रवार ३,०४८ १,५३,२५०
शनिवार ८,५७९ ३,३१,३१०
रविवार १७,४९८ ६,५५,६७५
सोमवार २०,१९६ ७,९१,६५०
मंगळवार २५,०२९ ९,५७,८२५

Comments
Add Comment

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

मुंबई : सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना

फुलांची होळी उपक्रमातून महापौर रितू तावडे यांनी दिला पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश

मुंबई : होळी व धुळवड/रंगपंचमी हे सण आनंदात साजरे करावेत आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक

दोन महिन्यांत राज्यातील सव्वा कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी

आरोग्य जागर : सिकलसेलपासून कर्करोगापर्यंतच्या मोहिमांना मोठे यश मुंबई : राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ

राज्यातील अकुशल कामगारांच्या थकीत मजुरीचा प्रश्न सुटला

मनरेगा अंतर्गत १ हजार १६८ कोटींचा निधी मंजूर; होळीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा श्रमिकांना मोठा दिलासा मुंबई :

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था

मुंबई : इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह