मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीची सुट्टी लक्षात घेत पर्यटकांच्या सोयीसाठी भायखळा येथील राणी बाग भाऊबीजच्या दिवशी बुधवारी सुरू ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार २७ ऑक्टोबरला वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय बंद राहील.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय दर बुधवारी बंद असते. मात्र, यापूर्वी महानगरपालिकेने मंजूर केलेल्या ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या बुधवारी हे उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार. त्यानुसार येत्या बुधवारी म्हणजेच दिनांक २६ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘भाऊबीज’, ‘दीपावली पाडवा’ निमित्त सार्वजनिक सुट्टी आहे.
मात्र, या सुट्टीच्या दिवशीही उद्यान व प्राणिसंग्रहालय पर्यटकांकरिता खुले राहणार आहे. जेणेकरून या सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राणी, वनस्पती, पक्षी यांना बघता येईल. त्यानुसार बुधवारी हे उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता खुले असल्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी ते बंद ठेवण्यात येते. यानुसार हे प्राणिसंग्रहालय गुरुवार, दिनांक २७ ऑक्टोबर, २०२२ रोजी जनतेकरिता बंद राहणार आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…