नांदेड : पार्डी (ता.अर्धापूर) येथील तिसऱ्या वर्गातील प्रल्हाद भगवान कांबळे (वय १०) हा मित्रांसोबत फटाके फोडत असताना एक फटाका फुटला नाही. त्यांने तो फटाका हातात घेऊन पाहत असताना अचानक फटाका फुटला. फटाक्याचा काही अंश प्रल्हाद कांबळे याच्या डोळ्यात गेल्यामुळे त्याच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
त्याला अर्धापुर येथील रुग्णालयात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी नांदेड येथील दवाखान्यात उपचारासाठी नेण्यास सांगितले. या वेळी डॉक्टरांकडून दिवाळीपूर्वीच फटाक्यांची आतिषबाजी सुरू असल्याने लहान मुलांच्या हातात फटाके देऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे.