मुंबई (वार्ताहर) : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक आपण कर्तृत्वाच्या जोरावर लढवत आहे,’ माझ्यावर कोणताही राजकीय वरदहस्त नाही.’ असे वक्तव्य शरद पवार-आशिष शेलार पॅनलचे उमेदवार अमोल काळे यांनी केले.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक उद्या गुरुवारी पार पडणार आहे. यावेळी शरद पवार – आशिष शेलार पॅनलकडून अमोल काळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटर संदीप पाटील असणार असून या निवडणूकीपूर्वी काळे यांनी आपण ही निवडणूक कर्तृत्वाच्या जोरावर लढवत आहे,’ माझ्यावर कोणताही राजकीय वरदहस्त नाही.’ असे वक्तव्य केले.
अमोल काळे यांना राजकीय संबंधामुळे ही संधी मिळाल्याची टीका झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना अमोल काळे म्हणाले की, मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मित्रा आहे, म्हणून माझ्यासंदर्भात असे बोलले जाते. पण मी माझ्या कर्तृत्वाच्या जोरावर एमसीए निवडणूक लढवत आहे. माझ्यावर कोणताही राजकीय वरदहस्त आहे हे आरोप चुकीचे आहेत. तसेच माझा एमसीएशी काही संबंध नाही असे म्हणणे चूकीचे आहे, मी जवळपास ७ वर्षे एमसीएमध्ये काम करतोय. मला मुंबई क्रिकेटसाठी भरपूर काही करायचे आहे, यासाठीच मी निवडणूक लढतोय. पवार-शेलार एकत्र फक्त माझ्यासाठी आलेले नाहीत. या आधीही पवार-शेलार किंवा राजकीय नेते राजकारणापलीकडे एकत्र आले आहेत. हे काही नवीन नाही, असे अमोल काळे म्हणाले.