मनसेच्या पाठपुराव्यामुळेच १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात!

Share

किशोर गावडे

मुंबई : मनसेने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर भांडुप पश्चिम येथील १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र भर रस्त्यावर पाईप टाकल्यामुळे पुन्हा एकदा वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. तसेच पादचा-यांना आणि शाळकरी मुलांनाही प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे महापालिका प्रशासनाने त्वरीत लक्ष देण्याची मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.

भांडुप पश्चिम येथील एस विभागातील नागरिकांना पाण्यासंदर्भात होत असलेल्या समस्येचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार आंदोलन करून निषेध व्यक्त केला होता. तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन यासंदर्भात नव्याने १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याबाबत आयुक्तांना एस विभाग कार्यालयात घेराव घालून चांगलेच खडसावले होते.‌ निषेध व्यक्त करून निवेदनही देण्यात आलेले होते.

कायम मेटल स्वरूपाची नवीन पाईपलाईन जोडण्यात येईल, असे आश्वासन सहाय्यक आयुक्त अजितकुमार आबी यांनी अनेक वेळा दिले होते. मात्र मागील दोन महिन्यापासून तब्बल ७ वेळा जीआरपी जलवाहिनी फुटल्याने पालिका प्रशासनाचे अक्षरशः धिंडवडे निघाले होते. महिलांनीही तीव्र संताप व्यक्त करत प्रचंड आक्रोश केला होता.

दैनिक प्रहार वृत्तपत्राच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल विभागातील नागरिकांनी होर्डिंग लावून ‘प्रहार’चे आभार मानले.

यासाठी सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेला पाठपुरावा, दिलेला इशारा तसेच वेळोवेळी महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत वॉर्ड ऑफिसर तसेच पाणी खात्यातील अधिकारी यांनी आम्ही युद्ध पातळीवर लवकरच पाण्याची नवीन पाईपलाईन मेटल स्वरूपाची १२०० मिमी व्यासाची बदली करणार आहोत, असे आश्वासन दिले होते.

त्यानुसार १६ ऑक्टोबर रोजी रात्रीच संभाजी मार्केट परिसरात नवीन पाईप आणले होते. व भर रस्त्यावर टाकले गेले. त्यामुळे पुन्हा एकदा वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे. वाहतुकीच्या कोंडीने नागरिक, शाळेतील मुले त्रस्त झाले आहेत.

प्रशासनाची हतबलता आणि वाहतूक पोलीस नसल्यामुळे सगळाच सावळा गोंधळ उडालेला आहे.

२०० मीटर लांबीच्या पाइप लाईनचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास येईल, तसेच पाईपलाईन नवीन जोडणी करत असताना पाणीपुरवठा हा नेहमीसारखा सुरळीत असेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

जलवाहिनीच्या कामास प्रारंभ होत असताना वाहतुकीच्या दृष्टीने अडथळा येऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, असे आवाहन माजी नगरसेविका अनिषा माजगावकर व विभाग अध्यक्षा वैष्णवी सरफरे तारकर यांनी केले आहे.

दरम्यान, दैनिक प्रहार वृत्तपत्राच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल विभागातील नागरिकांनी होर्डिंग लावून ‘प्रहार’चे आभार मानले.

संबंधित बातमी

भांडूपमध्ये मोठी जलवाहिनी पुन्हा फुटली; मनसेचा महापालिकेला घेराव

Recent Posts

कणकवली-करंजे येथील गोवर्धन गोशाळेचे ११ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची माहिती कणकवली : तालुक्यातील करंजे येथे गोवर्धन गोशाळा उभारण्याचे…

7 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार,२८ एप्रिल २०२५

पंचांग आज मीती वैशाख शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र भरणी. योग आयुष्यमान. चंद्र राशी…

28 minutes ago

Pakistani YouTube Channel Banned: पाकिस्तानातील अनेक यूट्यूब चॅनेल्सवर भारतात बंदी, खोटी, दिशाभूल करणारी माहिती पसरू न देण्यासाठी कारवाई

नवी दिल्ली: भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे 22 एप्रिल…

39 minutes ago

सलग चौथ्या रात्री सीमेवरील पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचे चोख प्रत्युत्तर

श्रीनगर : पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारुन ठार केले. या घटनेनंतर…

3 hours ago

RR vs GT, IPL 2025: गुजरातची पात्रता फेरीकडे घोडदौड

मुंबई(ज्ञानेश सावंत): आज जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने येणार…

3 hours ago

खारदांडा स्मशानभूमी पुन्हा बंद, सहा महिन्यांपूर्वीच केली होती दुरुस्ती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या एच/पश्चिम विभागातील खारदांडा स्मशानभूमी पुन्हा एकदा बंद ठेवण्याची वेळ आली…

4 hours ago