नवी दिल्ली : दिल्ली महिला आयोगाच्या (डीसीडब्ल्यू) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला. त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. स्वत: स्वाती मालीवाल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. सुदैवाने या हल्ल्यात स्वाती मालीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही हानी झालेली नाही, ते सर्व सुरक्षित आहेत.
डीसीडब्ल्यूच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सोमवारी सकाळी सांगितले की, काही वेळापूर्वी काही हल्लेखोर माझ्या घरात घुसले आणि त्यांनी हल्ला केला. माझी आणि माझ्या आईची गाडी फोडली, गुंडांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मी आणि आई दोघेही घरी नव्हतो, नाहीतर काय झाले असते माहीत नाही! तुम्ही काहीही करा, मी घाबरणार नाही. स्वाती मालीवाल यांनी याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रार करत असल्याचे सांगितले.
काही दिवसांपूर्वी स्वाती मालीवाल यांनी सांगितले होते की, त्यांना सोशल मीडियावर बलात्काराच्या धमक्या येत आहेत. याबाबत त्यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे. स्वाती मालीवाल यांनी आरोप केला आहे की, जेव्हापासून त्यांनी चित्रपट निर्माता आणि बिग बॉस स्पर्धक साजिद खानविरोधात आवाज उठवला आहे, तेव्हापासून त्यांना विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धमक्या दिल्या जात आहेत.
दिल्ली महिला आयोगाने (डीसीडब्ल्यू) अलीकडेच चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक साजिद खानला बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून काढून टाकण्याची मागणी केली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, साजिद खानवर १० हून अधिक महिलांचा लैंगिक छळ आणि अश्लील वर्तनाचा आरोप आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनीही याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…