अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपची माघार!

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीच्या रिंगणातून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली आहे. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.


यामुळे दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.


अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले होते.


अंधेरी पोटनिवडणूक लढवावी की बिनविरोध करावी, यावरून भाजपमध्ये एकमत होत नव्हते. अंधेरी पोटनिवडणुकीबाबत भाजपमध्ये दोन भिन्न मतप्रवाह असल्याचे आता आले. निवडणूक लढवण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार व भाजपचे उमेदवार मुरजी पटेल आग्रही होते. परंतू या निवडणुकीत पराभव झाल्यास आगामी मुंबई पालिका निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसेल व मुंबई पालिकेतील भाजपची पतच जाईल, असे स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीबाबत विचार करावा, असे देवेंद्र फडणवीसांचे म्हणणे होते.


यामुळे या पोटनिवडणुकीबाबतचा अंतिम निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्वच घेणार होते. त्यानुसार आता अंधेरी पोटनिवडणुकीच्या रिंगणातून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली आहे.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी