Sunday, July 6, 2025

देवदर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, ९ जणांचा अपघातात मृत्यू

देवदर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, ९ जणांचा अपघातात मृत्यू

बंगळुरू : हासन जिल्ह्यातील अरसेकेरे तालुक्यातील गांधीनगरजवळ टेम्पो ट्रॅव्हलर केएसआरटीसी बस आणि दूध वाहन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


हा अपघात हासन जिल्ह्यातील अरसेकेरे तालुक्यातील गांधी नगर गावाजवळ सुब्रमण्य, हसनंबा मंदिरांना भेट देऊन घरी परतत असताना शनिवारी रात्री उशिरा झाला. शिमोगा- अरसेकरे येथील राष्ट्रीय महामार्ग 69 वर हा भीषण अपघात झाला आहे.


टीटी वाहन आणि केएसआरटीसी बस आणि लॉरी यांच्यात हा अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. लीलावती (५०), चैत्र (३३), समर्थ (१०), डिम्पी (१२), तन्मय (१०), ध्रुव (२), वंदना (२०), दोड्डाय्या (६०), भारती (५०) अशी मृतांची नावे आहेत. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील धर्मस्थळाच्या मंजुनाथाचे दर्शन घेऊन ते गावी परतत होते. ते सर्व जण झोपेत असताना हा अपघात झाला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा