ठाकरे सेनेच्या ‘मशाल’ चिन्हावर समता पार्टीचा दावा!

अंधेरी पोटनिवडणुकीत समता पार्टीचा उमेदवारही देणार


मुंबई : 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेल्या 'मशाल' चिन्हावर दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने पुन्हा दावा केला आहे. १९९६ पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचे सांगत 'समता'ने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून यावर बुधवारी निर्णय अपेक्षित आहे. इतकेच नव्हे तर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणाही पक्षाने केली आहे.


समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर म्हणाले, ‘जॉर्ज यांनी १९९४ मध्ये समता पार्टीची स्थापना केल्यावर १९९६ मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना मशाल हे चिन्ह दिले होते. मात्र, सोमवारी निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशात २००४ मध्ये समता पार्टीची राज्य पक्ष म्हणून मान्यता काढून घेत असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंना त्यांचे धगधगती मशाल हे चिन्ह बहाल केले. याप्रकरणी आपण निवडणूक आयोगाला ई-मेल पाठवून या चिन्हावर हक्क सांगितला. देवळेकर म्हणाले, अंधेरीत तगडा उमेदवार निवडला आहे. मात्र, एकाच चिन्हावर दोन उमेदवार असल्यास मतविभागणीची शक्यता आहे. त्यामुळेच मशाल चिन्ह इतर पक्षाला देऊ नये, अशी मागणी केली आहे.


उद्धव यांची मशाल गोल आकारात भगव्या रंगात आहे. समता पार्टीची मशाल दोन रंगांत आहे. खाली व वर हिरवा, तर मधल्या पट्ट्यात पांढरा रंग आहे. मात्र, निवडणूक मतदान पत्रिकेत किंवा मतदान यंत्रावर ब्लॅक अँड व्हाइटमध्ये चिन्ह असते. यामुळे दोन्ही चिन्हे एकसमान दिसून मतदारांत संभ्रम होईल, असे देवळेकर यांना वाटते.

Comments
Add Comment

भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण यासाठी

मुंबईच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर यांचा विजय

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी १७ प्रभाग समित्यांपैंकी ६ प्रभाग

मत्स्यव्यवसाय आणि जल संवर्धन क्षेत्राचा वृद्धीदर ८.४ टक्क्यांवर

मुंबई : महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अत्यंत सकारात्मक बदल दिसून येत असून,

मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात आता 'आरोग्य कवच'

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढते अपघात आणि प्रवाशांचा जीवघेणा प्रवास रोखण्यासाठी राज्य सरकारने विशेष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार ६ मार्च रोजी मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, शुक्रवारी ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या