अलिबागमध्ये धान व भरडधान्य खरेदीकरिता पोर्टलवर मुदतवाढ

अलिबाग (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने खरीप पणन हंगाम २०२२-२३ अंतर्गत राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता शेतकरी नोंदणी करण्याबाबत कळविले होते. त्यानुषंगाने मंजूर झालेल्या धान व भरडधान्य खरेदी केंद्रावर सब एजंट संस्थांमार्फत धान व भरडधान्य शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत दि.१५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत होती.


परंतु, एनइएमएल पोर्टलवरील मागील हंगामातील दि.११ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या शेतकरी नोंदणीच्या अहवालानुसार शेतकरी नोंदणी अल्प प्रमाणात झाल्याचे दिसून आले. या कारणास्तव धान व भरडधान्य खरेदीकरिता एनइएमएल पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्यासाठी दि.२५ ऑक्टोबर २०२२ रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


त्यानुसार शेतकरी नोंदणी करताना या हंगामापासून ज्या शेतकऱ्यांचा ७/१२ आहे. त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे, त्याशिवाय नोंदणी पूर्ण होत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे त्याच शेतकऱ्याने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.


तरी ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे, त्या शेतकऱ्यांनी नोंदणीकरिता लाईव्ह फोटो अपलोड करण्याकरिता स्वतः उपस्थित राहावे. शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत दि.२५ ऑक्टोबर २०२२ असल्यामुळे दिलेल्या मुदतीतच शेतकरी नोंदणी पूर्ण करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी नोंदणीकरिता ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात येणार नाही, याची संबंधित सब एजंट संस्थानी नोंद घ्यावी, असे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे सरव्यवस्थापक डॉ.अतुल नेरकर यांनी सूचित केले आहे.

Comments
Add Comment

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना

मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....

महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची कसोटी

१४ माजी सदस्य रिंगणात; ५९ जागांसाठी रंगतदार लढाई अलिबाग : उमेदवारी अर्ज माघारीनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या