नाशिक पाठोपाठ पुण्यातही चालत्या बसने घेतला पेट

पुणे : नाशिकमधील खासगी प्रवासी बसच्या आगीची घटना ताजी असतानाच पुण्यात आज सकाळी साडेसहाच्या सुमारास चालत्या खाजगी ट्रॅव्हल बसने पेट घेतला. या बसमधून २६ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने ही घटना वेळीच लक्षात आल्याने थोडक्यात प्रवाशांचा जीव बचावला.


भिवंडी पाये गावातील २६ महिला रात्री अकरा वाजता खासगी बसने भीमाशंकरकडे निघाल्या होत्या. घोडेगावच्या पुढे गाडी आली असता बाजूने जाणाऱ्या एसटी बसच्या ड्रायव्हरने गाडीतून धूर निघत असल्याचे गाडी चालकाला सांगितले. चालकाने गाडी बाजूला लावली असता गाडीने खालून पेट घेतल्याचे त्याला दिसले असता त्याने सर्वांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले. सर्व महिला गाडीतून उतरल्या आणि काही क्षणात बस जळू लागली. डोळ्यादेखत संपूर्ण बस जळून खाक झाली. ही घटना पोलिसांना समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला आहे.


दरम्यान, काहीच दिवसांपुर्वी नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका येथे एका खासगी प्रवासी बसला एका ट्रकने धडक दिल्याने भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या भीषण दुर्घटनेत १३ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर, ३८ प्रवासी जखमी झाले.

Comments
Add Comment

साखरेचा गाळप हंगाम सुरू, पहिल्याच दिवशी २८ कारखान्यांना परवाने

पुणे (प्रतिनिधी): राज्यातील साखर गाळप हंगाम शनिवारपासून सुरु झाला. पहिल्याच दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप

काय सांगता ? २८० किलोच्या हिंदकेसरी कॅप्टन बैलाची इतक्या लाखांना विक्री

छत्रपती संभाजीनगर : फक्त २८० किलो वजन, चमकदार शरीर, मजबूत बांधा, वेगवान चाल यामुळे संपूर्ण मराठवाड्यात लोकप्रिय

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मिळाला शासकीय पूजेचा मान!

पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त परंपरेनुसार आज पहाटे विठ्ठलाची शासकीय पूजा पार पडली. यावर्षी

दहावी-बारावी परिक्षा वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीत होणार परिक्षा

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला आलेल्या प्रसिद्ध कीर्तनकाराचं निधन

पंढरपूर: कीर्तन परंपरेत संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे कोकणातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दत्ताराम सीताराम नागप

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव वाढला; "काळा दिन" कार्यक्रमासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले!

कोल्हापूर : "काळा दिन"आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात शनिवारी तणावाची परिस्थिती