Thursday, May 22, 2025

देशमहत्वाची बातमीपालघर

पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

मुंबई : पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे देण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे. पालघरच्या गडचिंचले गावात दोन वर्षांपूर्वी जमावाने दोन साधूंची ठेचून हत्या केली होती. या प्रकरणी सीआयडीकडून तपास सुरु होता.


हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी सातत्याने भाजपकडून करण्यात येत होती. मात्र तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शवला होता. राज्यात सत्ता बदलानंतर आता नव्या सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे देण्यास प्रतिज्ञापत्राद्वारे मान्यता दिली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे वर्ग केला जाणार आहे.

Comments
Add Comment