मुंबई : दाऊद टोळीशी संबंधित ५ जणांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. खंडणी प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. दाऊदचा साथीदार छोटा शकील आणि रियाज भाटीला अटक केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
अजय गंडा, फिरोज लेदर, समीर खान, पापा पठाण आणि अमजद रेडकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या गुन्हे शाखेने अलीकडेच गँगस्टर छोटा शकील आणि मेहुणा सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट आणि रियाझ भाटीला खंडणी प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर आता मंगळवारी याच प्रकरणात आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
वर्सोवा येथील एका व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडून ३० लाखांची कार आणि ७.५ लाख रुपयांची रोकड लुटण्यात या सर्वांची भूमिका समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चौकशीदरम्यान अधिक माहिती समोर येण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.