पत्नी व्यभिचारी असेल तर पोटगीवर हक्क नसेल : उच्च न्यायालय

चंदीगड : पत्नी जर व्यभिचारी असेल तर तिला पोटगी मागण्याचा अधिकार नसेल, असे म्हणत पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने कौटुंबिक कोर्टाचा निर्णय कायम ठेवला. हरियाणाच्या अंबाला फॅमिली कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात एका महिलेने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात अपिल केले होते. घटस्फोटासंबंधी ही याचिका होता. तिच्या पतीने सुनावणीदरम्यान पत्नीकडून अत्याचार होत असून तिच्या शिव्या खाव्या लागत असल्याचे सांगितले होते.


त्याशिवाय पतीने पत्नीवर गंभीर आरोप करत अंबाला जेलमध्ये असलेल्या उप अधीक्षकासोबत तिचे संबंध असल्याचे कोर्टाला सांगितलं होते. त्यामुळे डीपीसीपींनी आपल्या तपासात ही व्यभिचाराची केस असल्याचे स्पष्ट केले. अंबाला कोर्टाने घटस्फोटाचे प्रकरण मंजूर केले होते. सदर महिलेने आपल्याला पतीकडून पोटगी मिळावी, अशी मागणी केली होती.


महिलेने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात अपिल केले. उच्च न्यायालयाने खालच्या कोर्टाचा निर्णय कायम ठेवत व्यभिचारी पत्नीला पोटगीचा अधिकार नसल्याचं अधोरेखित केलं आहे. न्यायालयाने पोलिसांनी केलेल्या तपासाचा हवाला देत व्यभिचारावराची टिपण्णी केली आणि पोटगीची मागणी फेटाळून लावली.

Comments
Add Comment

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर