पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड


नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले नसेल, तर हे लवकर करा. यासाठी फक्त सात दिवस शिल्लक आहेत. ३१ डिसेंबरनंतर पॅन आणि आधार लिंक न करणाऱ्यांना १००० रुपये दंड आकारला जाईल. शिवाय, ज्यांचे पॅन-आधार लिंक नसेल, त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय देखील होऊ शकते.
नियमांनुसार, पॅन आणि आधार लिंक करणे सर्वांसाठी अनिवार्य आहे. नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करणाऱ्यांना आधार-आधारित पडताळणी करणे आवश्यक आहे. ३१ डिसेंबरच्या मुदतीनंतर, ज्यांच्याकडे पॅन आणि आधार दोन्ही असूनही त्यांनी ते लिंक केलेले नाही, त्यांना विलंब शुल्क लागू होईल. दरम्यान, पॅन-आधार लिंक करण्यासाठी नियमांची यादीही जाहीर करण्यात आली आहे, त्यानुसारच तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

काय आहेत नियम आणि अंतिम मुदत?

  •  प्राप्तिकर विभागाने ३ एप्रिल २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्यांचे आधार-पॅन लिंक नसेल, त्यांचे पॅन या तारखेनंतर निष्क्रिय होईल.

  •  ज्यांना १ ऑक्टोबर २०२४ नंतर पॅन कार्ड वाटप करण्यात आले आहे, त्यांनाही या वर्षाच्या अखेरीस (३१ डिसेंबरपर्यंत) पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे.

  • पॅन आधारशी लिंक करण्याची यापूर्वीची अंतिम मुदत ३१ मे २०२४ होती.

  • जर एखादी व्यक्ती ३१ डिसेंबर २०२५ रोजी पॅन आधारशी लिंक करत असेल, तर तिला १,००० रुपये दंड भरावा लागेल, कारण लिंक करण्याची मूळ तारीख आधीच उलटून गेली आहे.


जर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले, तर तुम्हाला खालील समस्यांना सामोरे जावे लागू शकते :
 

  • प्राप्तिकर परतावा भरण्यात अडचण येईल.

  • परतावा अडकू शकतो.

  • नवीन पॅन मिळवण्यासाठी दीर्घ प्रक्रियेतून जावे लागेल.

  • अधिक दराने टीडीएस आणि टीसीएस भरावा लागू शकतो.

  • फॉर्म 26AS चा वापर करता येणार नाही.

  • टीसीएस/टीडीएस प्रमाणपत्रे उपलब्ध होणार नाहीत.

  • बँक खाते उघडता येणार नाही.

  • क्रेडिट/डेबिट कार्ड घेता येणार नाही.

  • बँकेत ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रोख जमा करता येणार नाही.

  • १०,००० रुपयांपेक्षा जास्त बँक व्यवहार करता येणार नाहीत.

  • केव्हायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही.

  • सरकारी सेवांपासून वंचित राहावे लागू शकते.

  • म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमधील गुंतवणूक थांबू शकते.

Comments
Add Comment

Udhampur Accident: धमपूरमध्ये टँकरची डंपरला जोरदार धडक लागताच लागली भीषण आग; महामार्गावर थरकाप उडवणारी परिस्थिती

उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री उशिरा तेल टँकर आणि

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला