नाशिक बस दुर्घटनेत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

  52

नाशिक : नाशिक येथील नांदूर नाका येथे आज पहाटे खासगी बसचा अपघात झाला आणि त्यानंतर बसने पेट घेतल्यामुळे १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ३४ जण जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या पोहचायला उशीर झाल्याने काही प्रवाशी जागीच मृत्यूमुखी पडले. ही बस यवतमाळहून मुंबईकडे जात होती.


मिळालेल्या माहितीनुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्स या खासगी बसचा यवतमाळहून मुंबईकडे जात असताना नाशिक येथील नांदूर नाक्याजवळील मिरची हॉटेल येथे अपघात झाला. पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान हा अपघात घडला असून या बसचा कंटेनरशी झालेला अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर बसने लगेच पेट घेतला. बसमधील प्रवाशी झोपलेले असल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही आणि त्यामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे.


दुर्घटना झाल्यानंतर पोलिस अधिकारी आणि अग्निशामक दलाचे जवान सुमारे अर्धा ते पाऊण तासाने दाखल झाले होते. त्यानंतर जखमी झालेल्या ३४ जणांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची

पुण्यात दिसले इराणचे झेंडे आणि खामेनेईंचे पोस्टर

पुणे : इस्रायल - इराण दरम्यान युद्धबंदी झाल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले असले तरी दोन्ही देशांमध्ये तणाव कायम

आमदाराची मुलगी शासकीय आश्रम शाळेत शिकणार !

गडचिरोली : आजच्या काळात सर्व पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देण्याच्या तयारीत असतात ,