पक्षचिन्हासोबत आता पक्षाध्यक्षपदावरही शिंदेंचा दावा

  86

मुंबई : धनुष्यबाण कोणाचा? पक्ष कोणाचा? याबद्दल उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांचाही लढा सुरू असतानाच आता एकनाथ शिंदे यांनी थेट पक्षाध्यक्षपदावरच दावा सांगितल्याची माहिती समोर येत आहे. प्रतिज्ञापत्रात हा उल्लेख करण्यात आला आहे.


एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना पक्षाध्यक्ष पदाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षाच्या चिन्हानंतर आता पक्षाच्या अध्यक्षपदावरही शिंदेंनी दावा सांगितला आहे. ४० आमदार आणि १२ खासदारांसह अनेक प्राथमिक सदस्य आपल्या पाठीशी आहेत, असा उल्लेखही या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.


आज शिवसेनेचे पक्षचिन्ह कोणाचे? ठाकरेंचे की शिंदेंचे यावर आज निवडणूक आयोगाकडे सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेनेला पुरावे सादर करण्याची आजची शेवटची तारीख आहे, त्यामुळे आज शिवसेना फक्त पुरावे सादर करणार आहे. त्यामुळे ही सुनावणी आज होणार नाही. दरम्यान, धनुष्यबाण आम्हाला द्या, अशी मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.

Comments
Add Comment

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला

Amravati News : भयानक...अमरावतीत १३ फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव

अमरावती : तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी

चोरांनी मोबाईल टॉवर्सनाही सोडले नाही! लातूरमध्ये नेटवर्क मशीन्स चोरल्याप्रकरणी तिघांना अटक

लातूर: चोर काय चोरतील काही सांगता येत नाही, साखळी चोर, मोबाइल चोरपासून तर बरेच आहेत पण लातूर जिल्ह्यामधील