वांद्रे-वरळी सी लिंक अपघात प्रकरणी एकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर झालेल्या भीषण अपघात प्रकरणी एकाला अटक केली आहे. इरफान अब्दुल रहीम बीलकिया असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर ओव्हर स्पीडिंग आणि रॅश ड्रायव्हिंगचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.


मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाणा-या मार्गावर पोल नंबर ७६ आणि ७८ जवळ हा अपघात झाला. भरधाव वेगाने येणा-या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात गाड्या एकमेकांवर आदळल्या.


या अपघातात गजराज सिंह, सत्येंद्र फौजदार, राजेंद्र, चेतन कदम आणि अॅम्ब्युलन्स चालक सोमवाथ साळवे यांचा मृत्यू झाला. गजराज, सत्येंद्र, राजेंद्र हे सी लिंकवर सुरक्षारक्षक म्हणून काम करतात.

Comments
Add Comment

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

मुंबई : सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना

फुलांची होळी उपक्रमातून महापौर रितू तावडे यांनी दिला पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश

मुंबई : होळी व धुळवड/रंगपंचमी हे सण आनंदात साजरे करावेत आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक

दोन महिन्यांत राज्यातील सव्वा कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी

आरोग्य जागर : सिकलसेलपासून कर्करोगापर्यंतच्या मोहिमांना मोठे यश मुंबई : राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ

राज्यातील अकुशल कामगारांच्या थकीत मजुरीचा प्रश्न सुटला

मनरेगा अंतर्गत १ हजार १६८ कोटींचा निधी मंजूर; होळीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा श्रमिकांना मोठा दिलासा मुंबई :

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था

मुंबई : इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह