Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीआता ५-जीच्या नावाने फसवणूक

आता ५-जीच्या नावाने फसवणूक

मुंबई : केवायसी, वीजबिलांच्या नावाने नागरिकांची फसवणूक करणार्‍या भामट्यांनी आता ५-जीच्या नावाने ऑनलाईन लुटण्यासाठी जाळे पसरवल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे इंटरनेट वापरताना सतर्क राहणे गरजे आहे, असे आवाहन महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांनी केले आहे.

४-जी सीम कार्ड बंद होणार आहे, इंटरनेट सुविधा सुरू ठेवण्यासाठी एसएमएसद्वारे पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून ५-जी सुविधा मिळवा, असे सांगून नागरिकांच्या बँक खात्यांवर डल्ला मारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणारे भामटे पूर्वी बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून नागरिकांना केवायसी, डेबिट, क्रेडीट कार्ड बंद होण्याची भीती दाखवून बँकेचे खाते ऑनलाईन रिकामी करत होते. असाच काहीसा फंडा वापरून आता ५-जी सुविधेच्या नावाने पैसे लुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बदलत्या काळासोबत तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. त्यामुळे विविध क्षेत्रांतील व्यवहार आता स्मार्ट फोनवर सहज करता येतात. याचाच फायदा भामटे घेत असून त्यांनी लुटण्याचा ट्रेंड बदलला आहे. इंटरनेटवर लुटण्यासाठी बोगस वेबसाईटचे जाळे पसरवले आहे. त्यामुळे इंटरनेट वापरताना सतर्क राहणे गरजे आहे, असे आवाहन ठाण्याच्या सायबर सेलचे पोलीस निरीक्षक नीलम वाव्हळ यांनी केले आहे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -