मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील जागेत गुरुवारी सकाळी मद्याच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळाला. याचबरोबर प्लास्टिकचा कचराही मोठ्या प्रमाणावर साचल्याने विद्यापीठाची कचराकुंडी झाली का? अशी टीका होऊ लागली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई विद्यापीठाची मोकळी जागा बस पार्किंगसाठी घेण्यात आली होती. याला युवा सेना, छात्र भरती, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांनी विरोध केला होता. मात्र मुंबई महापालिकेकडून पत्र आल्याने जागा देण्यात आल्याची भूमिका विद्यापीठाने घेतली. त्याप्रमाणे बुधवारी झालेल्या सभेसाठी आलेल्या सर्व बसगाड्या विद्यापीठाच्या प्रांगणात पार्क करण्यात आल्या होत्या. याच ठिकाणी अनेकजण राहिलेही होते. यावेळी त्यांची जेवणाची तसेच अन्य सुविधा विद्यापीठाच्या प्रांगणात झाल्याने गुरुवारी सकाळी हे संकुल कचऱ्याने भरलेले दिसू लागले.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी जाऊन पाहणी केली, तर सर्वत्र कचरा आणि मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. अनेक भागात शौच केल्याने दुर्गंधी पसरल्याचे सावंत यांनी सांगितले. आता हा सर्व कचरा गोळा करून हेलिपॅडवर टाकला जात आहे. तिथे कचऱ्याचे वर्गीकरण करून तो गाडीतून नेत असल्याचेही ते म्हणाले.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…
डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…
CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…
मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Pehalgam Terror Attack) जगभरात एकच खळबळ…
पटना : बिहारमधील एका नीटची (NEET) परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक…