Tuesday, June 17, 2025

एकीकडे बाळासाहेबांचे आसन; दुसरीकडे संजय राऊतांची खूर्ची

एकीकडे बाळासाहेबांचे आसन; दुसरीकडे संजय राऊतांची खूर्ची

मुंबई : आज शिवसेनेचा शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे. तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे आसन लावण्यात आलेले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात ईडीच्या कोठडीत असलेले संजय राऊत यांची खूर्ची लावण्यात आलेली आहे.


दरम्यान, दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. आपापल्या मेळाव्याला गर्दी खेचण्यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न झाले. मात्र प्रत्यक्षात कुठे किती गर्दी होते, हे संध्याकाळी स्पष्ट होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा