कल्याण (वार्ताहर) : शनिवारी दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे कल्याण पश्चिमेला आग्रा रोडवर लावण्यात आलेल्या आणि कल्याण पूर्वेतील मलंगरोडवरील नवरात्रौत्सवाच्या तीन कमानी कोसळल्या. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी एका कारचे नुकसान झाले. त्याशिवाय या प्रकारामुळे कल्याणातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.
शनिवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास आचानक ढगांच्या गडगडाटात पावसाच्या जोरदार सरी सोसाट्याच्या वाऱ्यासह आल्या. कल्याण पश्चिमेच्या आग्रा रोडवर नवरात्रीनिमित्त मोठ मोठ्या होर्डींगच्या कमानी उभारण्यात आल्या आहेत. सोसाट्याच्या वाऱ्याने दुर्गाडी चौकात उभारण्यात आलेली एक कमान रस्त्यावर कोसळली. ज्यामध्ये त्याखाली आलेल्या एका कारचे नुकसान झाले.
तर छत्रपती शिवाजी महाराज चौकातही उभारण्यात आलेली कमान रस्त्यावर कोसळली. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावरून कोणतेही वाहन जात नव्हते. मात्र या प्रकारामुळे आग्रा रोडसह त्याच्या अंतर्गत रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झालेली पाहायला मिळाली. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांची अक्षरशः तारांबळ उडाली होती. तसेच कल्याण पूर्वेतील मलंगगड रोडवरील चेतना शाळेजवळ लावलेली कमान देखील कोसळली.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच कल्याण पूर्वेतही अशाच प्रकारे उभारण्यात आलेली कमान कोसळल्याचा प्रकार घडला होता. त्यापाठोपाठ आता कल्याण पश्चिमेतही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याने अशा धोकादायक कमानींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. त्याचप्रमाणे कल्याण पश्चिमेतील गफ्फुर डॉन चौक घास बाजार या ठिकाणी उभ्या असलेल्या कारवर भले मोठे झाड कोसळले. यात उभ्या असलेल्या चार चाकी गाडीचे नुकसान झाले आहे.
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…