मुख्यमंत्र्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या साथीने केला फायजी सेवेचा शुभारंभ

Share

पनवेल (वार्ताहर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे ५ जी सेवेचा शुभारंभ केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पनवेल येथील पोदी या ठिकाणी असलेल्या शाळेत उपस्थित राहून फायजी सेवेचा शुभारंभ केला.

महाराष्ट्रात जिओच्या ५ जी सेवा सुरू करण्यासाठी राज्यातील तीन शाळांची निवड करण्यात आली होती. त्यात पनवेल महापालिकेच्या नवीन पनवेल पोदी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेचा समावेश होता. यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोदी शाळेत उपस्थित राहून ५ जी सेवेचा शुभारंभ केला. तसेच शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.

यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बादली, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भुषण गगराणी, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, वाय.टी.देशमुख, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अॅड मनोज भुजबळ, तेजस कांडपीळे, उपायुक्त सचिन पवार यांच्यासह शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Recent Posts

नाल्यातून काढलेला गाळ ४८ तासांमध्ये उचललाच पाहिजे, भूषण गगराणी यांचे निर्देश

मुंबई : छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८…

27 minutes ago

ज्यांना काश्मीरला जायचं आहे त्यांनी संपर्क साधावा, मनसे नेते संदीप देशपांडे यांचे काश्मीरला जाण्याचे पर्यटकांना आवाहन

मुंबई : “ज्यांना काश्मीरला जायचं आहे, त्यांनी संपर्क साधावा. काश्मीरला जाणाच्या सहलीची सुरुवात आम्ही आमच्यापासून…

1 hour ago

श्रवण दोष बाधित बालक: जागरूकता आणि उपाययोजना

डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…

7 hours ago

मानसिकता समजून घ्यावी लागेल!

रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…

7 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २५ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…

8 hours ago

पहलगामचा हिशोब भारत चुकता करणार!

काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…

8 hours ago