भगर विषबाधा प्रकरणी औरंगाबादमध्ये आठ किराणा दुकानदारांवर गुन्हे दाखल

औरंगाबाद : नवरात्रोत्सवानिमित्त खरेदी केलेल्या भगर व भगरीचें पिठातून विषबाधा झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात समोर आली असल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अंदाजे दीडशे लोकांना भगरीतून विषबाधा झाली आहे. त्यामुळे आता प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या वैजापूर पोलिसांनी ८ किराणा दुकानदारांच्या विरोधात कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर शहरातील सबका मलिक एक या दुकानाचे मालक रमेश गोरक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच घायगाव आणि लोणी बु.येथील अशा एकूण ८ किराणा दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


पोलिसांनी केलेल्या कारवाईत करण्यात आलेल्या उल्लेखानुसार, वरील सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानात असलेले भगर आणि पीठ अपचनकारक असल्याचे माहित असतांना सुद्धा ग्राहकांना विकले. नागरिकांनी ते भगर खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली. त्यामुळे या दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर आणि कन्नड तालुक्यातील विविध गावातील नागरिकांना भगर खाल्याने विषबाधा झाली आहे. ज्यात वैजापूर तालुक्यातील ११८ गावकऱ्यांना भगरमधून विषबाधा झाली आहे. तर गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील २५ पेक्षा अधिक नागरिकांना विषबाधा झाली आहे. तर कन्नड तालुक्यातील १२ पेक्षा अधिका लोकांना विषबाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Comments
Add Comment

वारकरी संप्रदायाचा सर्वोच्च बहुमान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'संत एकनाथ महाराज वारकरी सेवा गौरव पुरस्कार' जाहीर

पैठण : वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा आणि पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संस्थानकडून

लोणार सरोवराबाबत चिंतेची बाब; सरोवरात वाढतेय पाण्याची पातळी

बुलढाणा: पर्यटक आणि शास्त्रज्ञांचे आकर्षण केंद्र असलेल्या महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील

नागपूर महापालिका निवडणूक: १५१ जागांसाठी प्रशासन सज्ज, दुबार मतदारांवर विशेष नजर

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मनपा आयुक्त अभिजित चौधरी

विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

शिक्षण विभागाकडून कठोर नियमावली; सुरक्षेत कसूर झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदार मुंबई :

धक्कादायक! कर्ज फिटवण्यासाठी केला मृत्यूचा बनाव; एक मेसेज आणि सत्याचा उलगडा

लातूर: फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक

अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू

बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच