राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा चौदा दिवसांनी वाढ

मुंबई : पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांचा मुक्काम आणखी वाढला आहे. संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी चौदा दिवसांनी वाढली आहे. मागील ५० दिवसांपासून तुरुंगात आहेत.


पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची आज न्यायालयाने दखल घेतली. परंतु आम्हाला अद्याप आरोपपत्राची प्रत मिळालेली नाही, असे संजय राऊत यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. यानंतर संजय राऊत यांना आरोपपत्राची प्रत देण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला दिले. कोर्टाच्या आदेशानंतर आज ही प्रत देऊ असे ईडीने सांगितले. जोपर्यंत तुम्ही आरोपपत्र देत नाही, तोपर्यंत संजय राऊत यांच्या कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करत असल्याचे कोर्टाने म्हटले.

Comments
Add Comment

वडाळा सहकार नगरमधील भाडेकरुंना मिळणार दिलासा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आयुक्तांना 'या' सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वडाळा सहकार नगर येथील महापालिका मालकीच्या इमारतींमध्ये महापालिकेचे भाडेकरु असून त्यांना

बांधकामाच्या ठिकाणी होणाऱ्या वायू प्रदूषणावरील  नियंत्रणाबाबत  विचारमंथन,  झपाट्याने होणाऱ्या विकासासोबत काही आव्हाने मुंबई समोर

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगर वेगाने वाढत आहे. नवनवीन पायाभूत सुविधा प्रकल्प, गृहनिर्माण व वाहतूक सुविधा

महायुतीला घवघवीत यश मिळणार : मुख्यमंत्री

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपची तयारी अंतिम टप्प्यात; मुंबई विभागाचा आढावा बाकी मुंबई:

Breaking News : दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर!

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी

मुंबई मेट्रो-३ साठी WhatsApp तिकीट सेवा सुरू; आता ॲपची गरज नाही!

'हाय' मेसेज करा आणि QR तिकीट मिळवा; MMRC चा प्रवाशांना 'स्मार्ट' दिलासा मुंबई: मुंबईतील लोकल प्रवाशांची सोय लक्षात घेऊन

भायखळा वस्र संग्रहालय ठरणार आता नवीन पर्यटन स्थळ

मुंबई (खास प्रतिनिधी) : संस्कृती, इतिहास आणि आधुनिकतेचा अनोखा संगम असलेले मुंबई महानगर देश-विदेशातील