Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रकापसाचे भाव वाढल्याने पॉलिस्टर वापरावर भर

कापसाचे भाव वाढल्याने पॉलिस्टर वापरावर भर

जळगाव (प्रतिनिधी) : गेल्या वर्षापासून कापसाचे दर वाढले असल्याने देशातील अनेक स्पिनिंग मिल उद्योजकांनी कापसाला पर्याय म्हणून कापड उद्योगात पॉलिस्टरचा वापर वाढवला आहे. त्यामुळे देशांतर्गत कापसाला असलेल्या मागणीत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता असल्यामुळे कापसाचे दर हे फार मोठया प्रमाणात वाढतील, अशी शक्यता खूप कमी असल्याची माहिती कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल गणत्रा यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी येथे दोन दिवसीय ‘ऑल इंडिया कॉटन ट्रेड मिट’चे आयोजन करण्यात आले होते. देशातील कापूस उद्योगाशी संबंधित उद्योजक,व्यापारी, निर्यातदार यांनी या चर्चासत्रात भाग घेतला. देशभरातून ५०० वर प्रतिनिधी यासाठी उपस्थित होते. रविवारी सायंकाळी या चर्चासत्राचा समारोप झाला. यावेळी समारोपप्रसंगी अतुल गणात्रा बोलत होते. शनिवारी चर्चासत्रास आलेल्या प्रतिनिधींनी थेट शेतावर जावून कापसाची पीक पाहणी केली.

गेल्या वर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्याने यंदा देशभरात कापसाची लागवड वाढली होती. त्यामुळे यंदा भारतात ३ कोटी ६५ लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता गणत्रा यांनी व्यक्त केली. मात्र सध्या देशाच्या अनेक भागात अतिवृष्टी होत असल्याने तसेच अजून काही दिवस असाच पाऊस सुरू राहिल्यास कापसाच्या उत्पादनात २० ते २५ टक्के घट येऊ शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. स्पिनिंग उद्योजकांनी पॉलिस्टरचा पर्याय स्वीकारला असतानाच सरकीला मागणी देखील घटली आहे. त्यामुळे कापसाच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो, असे गणात्रा यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत बोलतांना ते म्हणाले, आर्थिक मंदीमुळे बांगला देशात कापसाच्या निर्यातीला संधी नाही. अमेरिकेत दुष्काळ, पाकिस्तानात महापूर यामुळे या दोन्ही देशातील कापसाचे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे भारताच्या कापसाला मागणी वाढेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त करत यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नऊ हजारांपर्यंत भाव मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमास महाराष्ट्र जिनिंग असोसिएशनचे अध्यक्ष भूपेंद्र राजपाल, वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त उषा पोळ, बजाज स्टीलचे ललित कलंत्री, खान्देश जिनिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन, सीसीआयचे अर्जून दवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -