Friday, July 12, 2024
Homeदेशनामिबियाहून आलेल्या मादी चित्त्याचे नामकरण; मोदींनी ठेवले खास नाव

नामिबियाहून आलेल्या मादी चित्त्याचे नामकरण; मोदींनी ठेवले खास नाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांना पुन्हा एकदा देशात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास प्रयत्न केले. याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी नामिबियाहून ८ चित्ते भारतात आले.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये या चित्त्यांना सोडण्यात आले. पंतप्रधानांनी यातल्या मादी चित्त्याचे नामकरणही केले. या मादी चित्त्याचे नाव ‘आशा’ ठेवण्यात आले आहे. भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी नामिबियाहून चित्ते आणण्यात आले आहेत.

नामिबियाहून आलेल्या ८ चित्त्यांना शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले. पंतप्रधानांनी नामकरण केलेल्या मादी चित्त्याचे वय ४ वर्ष आहे. भारतात उतरल्यानंतर या चित्त्यांना फ्रान्स इंडोगो नावाने ओळखले जात होते. फ्रान्स इंडोगो नामिबियाचे व्यावसायिक आहेत. नामिबियातले लक्झरी गेम रिझर्व्ह त्यांच्या मालकीचे आहे. या चित्त्यांना त्यांच्याच संपत्तीतून आणण्यात आले. जंगली जनावर असल्यामुळे या चित्त्यांना सीसीएफ सेंटरमध्ये आणण्यात आले, तेव्हा त्यांना नाव देण्यात आले नव्हते. सीसीएफने पंतप्रधान मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त या चित्त्याचे नामकरण करण्याची विनंती केली.

कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियाहून आलेल्या चित्त्यांना २४ तास पूर्ण झाले आहेत. नॅशनल पार्कमध्ये सोडल्यानंतर हे चित्ते सामान्य वर्तणूक करत आहेत. त्यांनी शिकार केली आणि झोपही पूर्ण केली. पहिल्या दिवशी नवीन परिसर बघून थोडे घाबरलेले होते, पण आता त्यांचे आचारण सामान्य आणि सकारात्मक दिसत आहे, असे नॅशनल पार्ककडून सांगण्यात येत आहे. सगळे चित्ते नॅशनल पार्कमध्ये आरामात फिरत आहेत, या सगळ्या चित्त्यांवर करडी नजर ठेवली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -