कावळ्यांची संख्या घटली; पितृपक्षात अन्नघास भरवायलाही कावळे मिळेनासे झाले

  194

वसंत भोईर


वाडा : कधीकाळी शहरासह गावखेड्यात प्रत्येक वस्तीत सकाळ, सायंकाळ कावळ्यांची काव... काव... ऐकू येत असे. परिसरातील मोठ्या झाडांवर तर कावळ्यांची शाळाच भरायची. पण सध्या ग्रामीण भागासह शहरात कावळे दुर्मीळ झाले आहेत. मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड व पक्ष्यांना लागणारे खाद्य मिळणे कठीण झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. परिणामी पितृपक्षात अन्नघास भरवायलाही कावळे मिळेनासे झाले आहेत.


११ सप्टेंबरपासून पितृपक्षात सुरुवात झाली आहे. पितृपक्षात कावळ्यांना श्राद्धभोजन खाऊ घालण्याचे विशेष महत्त्व आहे. गरूड पुराणात तर कावळ्यांना यमाचे प्रतीक मानले जाते. श्राद्ध भोजनाचा घास कावळ्याने ग्रहण केला, तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळते, असे मानले जाते. मात्र गेल्या काही वर्षांत कावळ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. नदीकिनारी असलेल्या दहन घाटांचा अपवाद सोडला, तर वस्त्यांमध्ये सहसा कावळे पाहायला मिळत नाहीत.


वाढत्या बांधकांमामुळे झाडे तोडण्यात आली. त्यामुळे पक्ष्यांचा अधिवास नष्ट झाला. गर्दीच्या भागात तर कावळ्यांसह इतर पक्षीही दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे पितृपक्षात अन्नघास भरवण्यासाठी कावळ्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.


ज्या भागात मोठ्या वृक्षांची संख्या जास्त असते, तेथे कावळे दिसून येतात. बांधकामांसाठी व जंगलातही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. त्यामुळे कावळ्यांनीही आपला आधिवास बदलला आहे. शिवाय कावळ्यांसह पक्ष्यांची कमी होत चाललेली संख्या चिंताजनक आहे. - श्रीकांत ढालकर, पक्षीमित्र

Comments
Add Comment

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये

Stock Market Update: शेअर बाजारात भारतीय अर्थव्यवस्थेचा बोलबाला कायम सेन्सेक्स २०३.५१ व निफ्टी ६२.२५ अंकाने उसळला ! तज्ज्ञांकडून 'हा' सल्ला!

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात आश्वासक वाढ झाली आहे. सकाळी सत्र चालू होताच

IMD Monsoon Alert: जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने (IMD) जुलै महिन्यासाठी दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. देशवासीयांना या महिन्यात

LPG Cylinder Price Cut : LPG ग्राहकांना दिलासा! आजपासून कमी झाली किंमत; 'हे' आहेत नवे दर

व्यावसायिक सिलिंडर स्वस्त नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या पहिल्याचं दिवशी (July 2025) एलपीजी ग्राहकांना दिलासा मिळाला

Industrial Production Output: औद्योगिक उत्पादनात मे महिन्यात १.२% वाढ

प्रतिनिधी: भारताच्या औद्योगिक उत्पादनात मे महिन्यात नऊ महिन्यातील सर्वांत कमी वेगाने वाढ झाली आहे. भारताच्या

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद