मॉस्को (वृत्तसंस्था) : अण्णा भाऊ साठेंचा आम्हाला अभिमान आहे. वंचितांचे आवाज असलेले अण्णा भाऊ साठे यांचे भारतीय स्वतंत्रता संग्राम व गोव्याच्या मुक्ती संग्रामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. रशियाने आज त्यांचा गौरव केल्याने आम्हाला अभिमान वाटत आहे. शिवाय, मला या लोकार्पण सोहळ्याची संधी दिली याबद्दल आभारी असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
रशिया येथील मॉस्को येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी अनावरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते. मॉस्कोतील ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज स्टडी’ या संस्थेने लोकशाही अण्णा भाऊ साठे यांचा हा पुतळा उभारला आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा मॉस्कोच्या शासकीय वाचनालयात लावला जाणार आहे.
लंडनमधील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, जपानमधील विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अशा कार्यक्रमांसाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस हे त्या-त्या देशांमध्ये गेले होते. आता अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक रशियात झाले असल्याने महाराष्ट्रासाठी हा मोठा गौरवाचा विषय आहे.
साठे यांच्या लेखनावर रशियन क्रांतीचा मोठा प्रभाव होता. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता आणि रशियातील लेनिनच्या नेतृत्वाखालील कामगार क्रांतीमुळे ते भारावून गेले. त्यांच्या साहित्यकृतीमध्ये स्टॅलिनग्राडचा पोवाडा, रशियाचा माझा प्रवास आणि अनेक कथा आणि कादंबऱ्या रशियन भाषेत अनुवादित झाल्या आहेत.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…