नाना पटोलेंच्या सभेत पोलिसांसमोरच उदय सामंतांना जाळून मारण्याची धमकी

राजापूर : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पोलिसांसमोरच जाळून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या काल झालेल्या राजापुरातल्या सभेमध्ये ही घटना घडली आहे. रिफायनरीला विरोध करणाऱ्या एका कार्यकर्त्याने नाना पटोले आणि पोलिसांसमोरच ही धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.


धमकी दिलेल्या या नेत्याचे नाव जोशी असल्याचे सांगितले जात आहे. त्याने दिलेल्या धमकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ही घटना पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस अधिक्षक मोहनकुमार गर्ग यांनी उदय सामंत यांच्याशी याविषयी चर्चा केली आणि पुढील चौकशीची ग्वाही दिली.


रिफायनरी समर्थक आणि विरोधक यांनी राजापुरात नाना पटोले यांची भेट घेतली. यावेळी आपली भूमिका मांडत असताना रिफायनरी विरोधकांचा संताप अनावर झाला. त्यानंतर त्यातल्या जोशी यांनी उदय सामंत यांना जाळून मारण्याची धमकी दिली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पोलिसही उपस्थित होते.

Comments
Add Comment

साखरेचा गाळप हंगाम सुरू, पहिल्याच दिवशी २८ कारखान्यांना परवाने

पुणे (प्रतिनिधी): राज्यातील साखर गाळप हंगाम शनिवारपासून सुरु झाला. पहिल्याच दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप

काय सांगता ? २८० किलोच्या हिंदकेसरी कॅप्टन बैलाची इतक्या लाखांना विक्री

छत्रपती संभाजीनगर : फक्त २८० किलो वजन, चमकदार शरीर, मजबूत बांधा, वेगवान चाल यामुळे संपूर्ण मराठवाड्यात लोकप्रिय

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मिळाला शासकीय पूजेचा मान!

पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त परंपरेनुसार आज पहाटे विठ्ठलाची शासकीय पूजा पार पडली. यावर्षी

दहावी-बारावी परिक्षा वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीत होणार परिक्षा

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला आलेल्या प्रसिद्ध कीर्तनकाराचं निधन

पंढरपूर: कीर्तन परंपरेत संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे कोकणातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दत्ताराम सीताराम नागप

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव वाढला; "काळा दिन" कार्यक्रमासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले!

कोल्हापूर : "काळा दिन"आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात शनिवारी तणावाची परिस्थिती