मुंबई : रुळांची देखभाल, सिग्नल यंत्रणा दुरुस्ती तसेच ओव्हरहेड वायर यांसारख्या कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ पर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांच्यादरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबवून पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत.
तसेच ठाण्यातून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.५९ वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. तर या सेवा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. पुढे त्या अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
पनवेल आणि बेलापूर येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत सुटणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल आणि बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येतील. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई-वाशी भागामध्ये विशेष उपनगरी लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. ब्लॉक कालावधीत बेलापूर, नेरुळ – खारकोपर लाईन सेवा उपलब्ध राहतील.
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत सिंधू जल करार स्थगित केला.…
नवी दिल्ली : आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक मतदान ओळखपत्र, वाहन परवाना अन् पासपोर्ट एकाच…
इस्लामाबाद : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.…
माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांची माहिती कणकवली : तालुक्यातील करंजे येथे गोवर्धन गोशाळा उभारण्याचे…
पंचांग आज मीती वैशाख शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र भरणी. योग आयुष्यमान. चंद्र राशी…
नवी दिल्ली: भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे 22 एप्रिल…