Monday, April 28, 2025
Homeमहत्वाची बातमीहनुमानाने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली : नवनीत राणा

हनुमानाने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली : नवनीत राणा

जळगाव : खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. जेलमध्ये सुध्दा हनुमान चालीसा पठण केली, यावेळी हनुमानाला म्हटले होते की, माझी भक्ती खरी असेल तर उध्दव ठाकरेंना त्यांची जागा दाखव आणि आज हनुमानाने उध्दव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली. आता घरात उभे राहायला सुध्दा कार्यकर्ता उरला नाही असे म्हणत नवनीत राणा यांनी उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

जळगावमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आम्हाला तुरुंगामध्ये टाकणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याकडे आता सतरंजी उचलायला ही कार्यकर्ता शिल्लक नाही, अशी टीका राणा दाम्पत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

जळगाव शहरातील महाराणा प्रताप गणेश मंडळात खासदार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा दाम्पत्याचा हनुमान चाळीसा पठणाचा कार्यक्रम झाला. यापूर्वी राणा दाम्पत्यांनी मंडळाच्या बाप्पाचे दर्शन घेत आरती केली. त्यानंतर हनुमान चाळीसा पठण केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -