पुणे : भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसप्रमाणे राष्ट्रवादी पक्ष देशभर पसरलेला नाही. काही मोजक्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे काम चालते. त्यामुळे अति आत्मविश्वास चांगला नसल्याचा सल्लाही पडळकर यांनी सुप्रिया सुळे यांना दिला आहे.
पडळकर म्हणाले की, राहुल गांधींसारख्या केंद्रीय नेतृत्त्वाचा पराभव होऊ शकतो तर राष्ट्रवादी पक्ष त्या तुलनेने खुपच छोटा असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी २०२४ मध्ये बारामतीमध्ये परिवर्तन होऊन भाजपचाच गुलाल उधळला जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली असून, भाजपचे लक्ष यंदाच्या वेळी मिशन बारामती असल्याचे उघडपणे दिसून येऊ लागले आहे.