देशातील पहिले 'नाईट स्काय अभयारण्य' लडाखमध्ये

लडाख (वृत्तसंस्था) : देशातील पहिले 'नाईट स्काय अभयारण्य' उभारण्यात येत आहेत. लडाखमध्ये देशातील पहिली 'नाईट स्काय सँच्युअरी' उभारण्यात येत आहे. हे अभयारण्य लडाखमधील हेन्ली येथील थंड वाळवंटात उभारण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी शनिवारी याबाबतची माहिती दिली आहे. हे देशातील पहिलं 'नाईट स्काय अभयारण्य' असेल.


नाईट स्काय सँच्युअरी म्हणजे अभयारण्य जिथे खुल्या आकाशात चांदण्या पाहता येतात. येथे प्रकाश नसतो. या परिसरात प्रकाश प्रदूषणाला प्रतिबंध असतो. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितल की, लडाखमधील हेन्ली येथे डार्क स्काय रिझर्व्ह उभारण्यात येणार आहे. हे ऑप्टिकल, इन्फ्रा-रेड आणि गॅमा-रे दुर्बिणीसाठी जगातील सर्वोच्च ठिकाणांपैकी एक असेल.


लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आरके माथूर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, 'डार्क स्काय रिझर्व्ह' साइट विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना देईल. नुकतेच केंद्रशासित प्रदेश प्रशासन, लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काऊन्सिल लेह आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स यांनी डार्क स्काय रिझर्व्ह सुरू करण्यासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.


नाईट स्काय सँच्युअरीसाठी हेन्ली हे सर्वोत्तम ठिकाण आहे. कारण येथे दूर-दूरपर्यंत मानवी वस्ती नाही. त्यामुळे थंड वाळवंटात चांदण्यांच्या प्रकाशात सुंदर आकाशाचं निरीक्षण करता येईल. रात्रीच्या आकाशाचे प्रकाश, प्रदूषण आणि रोषणाईपासून संरक्षण करण्यासाठी सर्व स्टेक होल्डर एकत्रितपणे काम करतील, अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे. कारण तो वैज्ञानिक आणि नैसर्गिकरित्या एक गंभीर धोका आहे. लडाखच्या थंड वाळवंटी प्रदेशात हेनली प्रकल्पासाठी सर्वात योग्य आहे. इथे लोकांची गर्दी नाही. तसेच संपूर्ण वर्षभर आकाश निरभ्र आणि कोरडे हवामान असते.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे