जालंधर : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना मोठी भेट दिली आहे. राज्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचा (यूजीसी) सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे. एका व्हिडिओ संदेशात मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यानंतर सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याची घोषणा केली.
१ ऑक्टोबर २०२२ पासून सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. सीएम मान यांनी लवकरच महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अतिथी प्राध्यापकांची भरती केली जाईल अशी घोषणाही मान यांनी केली आहे. यामुळे शिक्षकांची कमतरता दूर होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सातवा वेतन आयोग आणि शिक्षक भरती बरोबरच जुन्या कंत्राटी अतिथी प्राध्यापकांच्या मानधनातही वाढ करण्यात येणार असल्याचं मान यांनी यावेळी जाहीर केलं याबाबतची अधिसूचना लवकरच काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री मान यांनी दिले आहेत. मान यांच्या या निर्णयांमुळे शिक्षण दिनी शिक्षकांना खरा मान मिळाल्याचं बोललं जात आहे.