मुंबईत कंडोम खरेदीचा विक्रम

मुंबई : ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून मुंबईकरांनी कंडोम्सची विक्रमी खरेदी केल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. या अॅपवरून अंडी, कंडोम्स, सॅनिटरी नॅपकीन आणि टॅम्पॉन सर्वाधिक मागवले जात असल्याचे आढळून आले आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी या गोष्टींच्या ऑनलाईन ऑर्डरमध्ये १६ पटींनी वाढ झाली आहे.


हल्ली सगळीकडे ऑनलाईन फूड मोठ्या प्रमाणात ऑर्डर केले जाते. भूक लागली की घरबसल्या फास्ट डिलवरी देत या अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून हल्ली जेवण, फास्ट फूड यांसारख्या गोष्टी ऑर्डर केल्या जातात. मात्र एका ग्राहकाने त्याच्या मुलांसाठी आईस्क्रिम आणि चिप्स ऑर्डर केले असता चक्क कंडोम डिलीवर करण्यात आल्याचे प्रकरण मागच्या आठवड्यात उघडकीस आले होते. त्यानंतर आता स्विगी आणि इन्स्टामार्ट ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून मुंबईत कंडोम्सची विक्रमी विक्री केल्याची माहिती उजेडात आली आहे.



स्विगी इन्स्टामार्टच्या माध्यमातून नव्याने पुरवण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांनी मागच्या वर्षभराच्या तुलनेत गेल्या १२ महिन्यांमध्ये ५७० पट अधिक कंडोम्स खरेदी केले आहेत.


सध्या हे इन्स्टामार्ट बंगळुरू, मुंबई, हैदराबाद, दिल्ली, चेन्नई येथे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या शहरांमध्येही सॅनिटरी नॅपकिन्स, मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पॉन अशा वस्तूंच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती