दुबई (वृत्तसंस्था) : आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरू असली तरी अष्टपैलू रविंद्र जडेजाच्या दुखापतीमुळे भारताला धक्का बसला आहे. जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली असल्याची माहिती बीसीसीआयने शुक्रवारी दिली. त्यामुळे जडेजाला आशिया चषक स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांना मुकावे लागणार असून त्याच्या जागी अक्षर पटेलला संघात संधी दिली जाणार आहे.
रविंद्र जडेजा सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. बीसीसीआयने अक्षर पटेलला रविंद्र जडेजाची रिप्लेसमेंट म्हणून उर्वरित आशिया कपमध्ये संधी देणार असल्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, ‘भारताच्या वरिष्ठ निवड समितीने उर्वरित आशिया कपच्या सामन्यांसाठी दुखापतग्रस्त रविंद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संघात स्थान दिले आहे.
रविंद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो उर्वरित स्पर्धेला मुकणार आहे. तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली आहे. अक्षर पटेलला आशिया कपसाठी स्टँड बाय म्हणून संघासोबत ठेवण्यात आले होते. तो लवकरतच दुबईत संघात दाखल होईल.’
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…