आता काँग्रेसही फुटणार?

मुंबई : एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीची चर्चा असताना आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आधीच केंद्रातील अंतर्गत मतभेदांमुळे काँग्रेस अडचणीत आहे. तर आता महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये देखील फूट पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


शिवसेनेतील जवळपास ४० आमदार फुटून शिंदे-फडणवीस प्रणित शिवसेना-भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर, आता काँग्रेसचा एक मोठा गट फुटणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे शिंदे सरकारच्या पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात यापैकी २ काँग्रेस नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेनंतर आता काँग्रेसलाही भाजपकडून जोरदार धक्का देण्याची चिन्हं आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, आशीष कुलकर्णी यांच्या घरी फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची भेट झाली. त्यांच्यासोबत तीन नेते आणि ९ आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये उभी फूट पडू शकते. या भेटीमागचे निमित्त गणपतीचे असले तरी या दरम्यान काय चर्चा झाली असावी यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.


येत्या ऑक्टोबर महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात काँग्रेसमधील एका गटाला स्थान मिळण्याचा अंदाज आहे.


महाराष्ट्र काँग्रेसमधील खदकद विधानपरिषद निवडणुकीपासूनच दिसलेली आहे. काँग्रेसमधील काही मंत्र्यांसह आमदारांचा गट फुटण्याची चर्चा विधान परिषद निवडणुकीच्या निकालापासूनच राजकीय वर्तूळात सुरु आहे.


याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसमधील गट फुटून भाजपात सामिल झाला तर काँग्रेसमधील काही माजी मंत्र्यांना नव्या सरकारमध्ये संधी मिळणार का? याकडे लक्ष आहे.

Comments
Add Comment

पाण्याची गळती आणि दुषित पाणी समस्येवर लक्ष द्या, आयुक्तांचे जल अभियंता विभागाला निर्देश

मुंबई : मुंबई उत्तर मुंबईतील पाण्याच्या समस्येबाबत महापालिका आयुक्तांसोबतच लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या

मुंबई आशियातील 'आनंदी' शहर!

टाइम आऊट सर्वेक्षणात पहिले स्थान; ८७% नागरिक खूश नवी दिल्ली: मुंबईला २०२५ साठी आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून

गोराईत उभारले जाणार भारतातील पहिले मॅग्रोव्ह पार्क

उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या पुढाकाराने साकारणार प्रकल्प मुंबई : भारतातील पहिले ‘मॅंग्रोव्ह-थीम

अमिताभ बच्चन यांनी विकले २ आलिशान फ्लॅट्स; १२ कोटींना झाला व्यवहार

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव येथे असलेले त्यांचे दोन लक्झरी फ्लॅट्स विकले

मुंबई महापालिकेचे प्रभाग आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर रोजी वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलने ५ जणांना चिरडले!

मस्जीद बंदर रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना, रेल्वे कर्मचा-यांच्या आंदोलनाने घेतले बळी, दोष कुणाचा? मुंबई :