भाजपचा 'मिशन मुंबई' प्लॅन ठरला!

  84

बाप्पांच्या दर्शनाने अमित शहा करणार शुभारंभ!


मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा ५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते लालबागचा राजा, सिद्धिविनायक या प्रमुख गणपतींचे दर्शन घेणार आहेत. याच दौऱ्यात अमित शहांच्या उपस्थितीत भाजप मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ करणार आहे. मुंबई दौऱ्यावर असताना अमित शाह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठी अमित शाहांच्या नेतृत्वात बैठक घेतली जाणार आहे.


अमित शाह ५ तारखेला मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणपतीचेही दर्शन घेणार आहेत.


विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक अमित शहा यांच्या नेतृत्वात होणार आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी यंदा भाजप विशेष मेहनत घेत आहे. त्याच दृष्टीने अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ होईल.



अमित शाह हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून लालबागच्या दर्शनाला येतात. शाह २०१७ मध्ये भाजपचे अध्यक्ष झाले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये कोविडमुळे अमित शाह यांना लालबागच्या राजाचे दर्शन घेता आले नव्हते. मात्र, यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने अमित शाह लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येणार आहेत.


दरम्यान, भाजपने आशिष शेलारांकडे पुन्हा मुंबईची जबाबदारी दिली आहे. आशिष शेलार हे मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आहेत. मुंबई महापालिकेच्या दृष्टीने रणनीती आखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असेल. काही दिवसापूर्वीच त्यांनी आपली झलक दाखवली होती. आशिष शेलार म्हणाले होते, ''मुंबईवरील एका कुटुंबाची मक्तेदारी संपली पाहिजे. आमचे २००+ नगरसेवक निवडून येतील आणि आमचे ४५+ खासदार निवडून येतील.''

Comments
Add Comment

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर

सार्वजनिक वाहनांमध्ये बसवणार पॅनिक बटण, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी): सार्वजनिक प्रवासी वाहनांमधील महिलांच्या सुरक्षेचा मु्द्दा ऐरणीवर आला होता. सार्वजनिक